राखी हिन्दुवानी, हिन्दुवनको तिलक राख्यो |
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले.
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपणच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे.
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे.
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे.
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे.
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे.
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे.
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते.
देवल गिराविते , फिराविते निसान अली |
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||गौर गणपती आप , औरनको देत ताप |
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते.
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते.
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती.
============================== ============================
No comments:
Post a Comment